संघाच्या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी निरपराध ओबीसी तरुणाचा बळी घेतला

पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार ओबीसी आरक्षण संपलं अशी अफवा पसरवल्यामुळे लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत कराड या ओबीसी समाजातील तरुणाने भयभीत होऊन आत्मबलिदान दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आरोप केला की, “राजकीय पोळी भाजण्यासाठी ज्यांनी ओबीसी आरक्षण संपलं असा संभ्रम निर्माण केला, त्यांनी एका तरुणाचा मनुष्यवधच केला आहे.
”केदार म्हणाले, “मराठा समाजाच्या हैदराबाद गॅझेट संदर्भातील जीआरच्या पार्श्वभूमीवर मीडियामध्ये ओबीसी आरक्षण संपले असा खोटा प्रचार करण्यात आला. नव्याने निर्माण झालेल्या स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी या अफवांना खतपाणी घातले आणि त्यामुळेच भरत कराडने बलिदान दिले.
हे दुर्दैवी असून याला हेच नेते जबाबदार आहेत.”त्यांनी पुढे राज्य सरकारकडे मागणी केली की, “सरकारने चौकशी करून मीडियामध्ये आरक्षण संपल्याची अफवा कोण पसरवत आहे, त्यामागील तथ्य काय आहेत याचा खुलासा करावा. मुख्यमंत्री स्वतः याबाबत विधान करून समाजात निर्माण झालेला संभ्रम दूर करावा.”पँथर सेनेने हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगत, “स्वयंघोषित संघटनेचे ओबीसी नेते हे सरकारच्या हस्तकांसारखे वागत आहेत आणि त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे एका बहुजन तरुणाचा बळी गेला आहे,” अशी टीका केली.



