वाढदिवसानिमित्त मोठी जबाबदारी : वसीम शेख यांची एआयपीएस मुस्लिम पँथर आघाडीच्या महाराष्ट्र संघटकपदी नियुक्ती

बीड | प्रतिनिधीऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी एआयपीएस (मुस्लिम पँथर आघाडी) च्या महाराष्ट्र संघटकपदी शेख वसीम यांची नियुक्ती जाहीर केली आहे. वाढदिवसानिमित्त ही महत्त्वाची जबाबदारी देत त्यांना पुढील सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.शेख वसीम हे दलित, मुस्लिम, आदिवासी आणि बहुजन घटकांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करणारे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. स्वाभिमान, प्रामाणिकपणा आणि निष्ठेने चळवळीशी जोडून त्यांनी बीड जिल्ह्यात संघटना मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांमध्ये धावून जाऊन अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले असून राज्यभर संघटनेच्या दौऱ्यांमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.गावकुसात राहणारा एक सामान्य तरुण ते राज्यभर सोशल मीडियाच्या माध्यमातून चळवळीचा लढाऊ चेहरा अशी त्यांची झालेली ओळख ही त्यांच्या मेहनतीचे आणि तळमळीचे फलित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.मुस्लिम समाजावर जिहादच्या नावाखाली होत असलेले अन्याय आणि अत्याचार थांबले पाहिजेत, तसेच मुस्लिम तरुणांना संघटित करून त्यांच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उभारला पाहिजे, ही संघटनेची भूमिका असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.यावेळी शेख वसीम यांची “AIPS मुस्लिम पँथर आघाडी महाराष्ट्र संघटक तथा जिल्हा सचिव बीड” या पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यांच्या पुढील कार्याला “जयभीम” म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या तसेच चळवळीशी अशीच बांधिलकी आणि तळमळ कायम ठेवावी, असे आवाहन करण्यात आले.



