दिपक केदार यांच्या नेतृत्वाची राज्यभर चर्चा; विजय थलपतींशी तुलना होताच राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रातील आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत गेल्या काही दिवसांपासून ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दैनिक सम्राटचे पत्रकार तसेच आंबेडकरी विचारांचे वकील नामदेव सावते या सामाजिक विश्लेषकाने आपल्या फेसबुक हँडलवर पोस्ट करत, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ पुढे नेण्यासाठी महाराष्ट्रात विजय थलपतींसारखे प्रभावी नेतृत्व उदयास येऊ शकते का? दिपक केदार यांच्या गुणधर्मांचा विचार करता ही शक्यता नाकारता येत नाही,” असे मत व्यक्त केले.या पोस्टनंतर राज्यभरात सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. अनेकांनी या मताचे समर्थन करत दिपक केदार यांच्या गेल्या दोन दशकांतील सामाजिक कार्याची दखल घेतली आहे.दिपक केदार हे ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांनी गेली 20 वर्षे सामाजिक परिवर्तनासाठी सातत्याने काम केले आहे. बहुजन, शोषित आणि वंचित समाजाच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत त्यांनी अनेक आंदोलनांचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे आजच्या बहुजन चळवळीला नवा चेहरा मिळाल्याचे त्यांच्या समर्थकांचे मत आहे.दरम्यान, विजय थलपतींसारख्या मोठ्या जनआधार असलेल्या नेतृत्वाशी तुलना झाल्यानंतर ऑल इंडिया पँथर सेना पेजवरून प्रतिक्रिया देण्यात आली. “ही तुलना आमच्यासाठी सन्मानाची बाब नसून कार्याची दखल घेतली जाते, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे,” असे संघटनेकडून सांगण्यात आले.तामिळनाडूतील राजकीय निकालानंतर दिपक केदार यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी, “तामिळनाडू अभिनेता आणि नव्या नेतृत्वाला महत्त्व देतो, उत्तरप्रदेश जातीय समीकरणांना महत्त्व देतो, तर महाराष्ट्र अजूनही घराणेशाहीत अडकलेला आहे. जोपर्यंत घराणेशाही संपत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात मोठी परिवर्तनाची क्रांती घडणे कठीण आहे,” असे मत व्यक्त केले होते.तसेच त्यांनी बच्चू कडू यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ देत, “उगाच बच्चू कडूंना स्वतःचा पक्ष गुंडाळून शिवसेनेत जावे लागले नाही,” असेही वक्तव्य केले होते.या सर्व घडामोडींमुळे दिपक केदार हे केवळ सामाजिक नेतृत्वापुरते मर्यादित न राहता भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रभावी चेहरा म्हणून पुढे येऊ शकतात का, याबाबत चर्चांना अधिक वेग आला आहे.



