Uncategorized

नांदेडमध्ये लवकरच भव्य पॅंथर मेळावा; राज्यभर संघटन बांधणीला वेग

नांदेड : ऑल इंडिया पॅंथर सेना महाराष्ट्र राज्य आणि नांदेड जिल्ह्याच्या वतीने लवकरच भव्य पॅंथर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य संयोजक तथा नांदेड जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांनी दिली आहे. या मेळाव्याची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.या मेळाव्यात राज्यभरातील पॅंथर कार्यकर्ते, भीम सैनिक, युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी चळवळीतील मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. विविध जिल्ह्यांत सामाजिक आणि संघटनात्मक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मानही यावेळी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.संघटन मजबुती, चळवळीची दिशा आणि समाजातील विविध प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यासाठी हा मेळावा ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. “आंबेडकरी चळवळीची ताकद दाखवण्याची हीच वेळ असून, एकजूट, संघटन आणि संघर्षासाठी सर्वांनी सज्ज व्हावे,” असे आवाहन माधव भालेराव यांनी केले.ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या नेतृत्वाखाली हा मेळावा पार पडणार असून, राज्यभर जिल्हानिहाय पॅंथर मेळावे घेण्याची संघटनेची तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.येणाऱ्या 2029 च्या पार्श्वभूमीवर संघटनाला व्यापक स्वरूप देण्याचे काम सुरू असून, दिपक केदार यांच्या व्हिजननुसार सामाजिक आणि संघटनात्मक संघर्ष अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे माधव भालेराव यांनी त्यांच्या फेसबुक हॅण्डलवरून जाहीर केले आहे.“जय भीम, जय पॅंथर”च्या घोषणांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, या मेळाव्याकडे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!