दीपक केदार: दलित समाजाचा खरा हिरा, अन्यायाविरुद्ध लढणारा निर्भीड नेता…

महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपासून ते वाड्यावस्त्यांपर्यंत, तांड्यापासून ते दलित वस्त्यांपर्यंत, अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध सतत लढणारा एक नेता म्हणजे दीपक केदार. डॉ. बी.डी. गोंगे पाटिल यांनी दीपक केदार यांना “दलित समाजाला मिळालेला हिरा” संबोधत त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. “दीपक केदार हे सत्याला सत्य म्हणणारे आणि गरीब-श्रीमंत असा भेद न करणारे खरे नेते आहेत,” असे डॉ. गोंगे पाटिल म्हणाले.
दीपक केदार यांनी केवळ दलित समाजासाठीच नव्हे, तर मुस्लिम, मराठा आणि इतर सर्व समाजघटकांसाठी अथक काम केले आहे. सत्ता किंवा पैसा नसतानाही, 24 तास प्रवास करत, गोरगरीबांच्या अश्रूंना ढाल बनून त्यांनी अन्यायाविरुद्ध लढा दिला आहे. त्यांची ही तळमळ आणि सामाजिक बांधिलकी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
डॉ. गोंगे पाटिल यांनी दलित समाजाला आवाहन केले आहे की, “दीपक केदार यांच्यासारख्या चांगल्या नेत्याला जपा. सत्ता आणि पैशासाठी तुमचा उपयोग करून घेणारे नेते खूप आहेत, पण खऱ्या नेत्याला साथ द्या. त्यांना मुकू नका.” त्यांनी पुढे सांगितले की, दीपक केदार यांच्यासारखा नेता हा समाजाच्या खऱ्या विकासासाठी आणि न्यायासाठी लढणारा योद्धा आहे.दीपक केदार यांच्या या कार्यामुळे ते महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील एक अग्रगण्य नाव बनले आहेत. त्यांचा हा लढा आणि समर्पण समाजातील प्रत्येक घटकासाठी आशेचा किरण ठरत आहे.
डॉ. भाऊसाहेब गोंगे हे आशीर्वाद हॉस्पिटल चे प्रमुख आहेत. हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांची सेवा करतात.छत्रपती संभाजीनगर स्तिथ त्यांचं हॉस्पिटल आहे. त्यांची ही प्रतिक्रिया दिपक केदार यांना बळ देणारी आहे – पँथरनामा