नितीन शंकपाळ यांच्या हत्येचा निषेध: ऑल इंडिया पॅंथर सेनेचा कुटुंबाला आधार, न्यायासाठी लढ्याचा निर्धार

छत्रपती संभाजीनगर: राजनगर येथील अनुसूचित जातीच्या चर्मकार समाजातील तरुण नितीन शंकपाळ यांच्या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत ऑल इंडिया पॅंथर सेनेने पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. या हृदयद्रावक घटनेने कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, त्यांना न्याय आणि आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी सेनेने आक्रमक पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.
कुटुंबाची दयनीय अवस्थानितीनच्या हत्येने त्यांचे वडील, आई, पत्नी आणि दोन लहान मुलांचे कुटुंब पूर्णपणे कोलमडले आहे. कमवता तरुण गमावल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी नितीनच्या पत्नीवर पडली आहे. दोन चिमुकल्यांचे शिक्षण आणि घराचा खर्च यासाठी त्या एकट्या लढत आहेत.
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या मागण्याऑल इंडिया पॅंथर सेनेने या अमानुष हत्येचा जाहीर निषेध केला असून,
खालील मागण्या ठेवल्या आहेत: 🔘 आरोपींना फाशीची शिक्षा देऊन प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवावे. 🔘 पीडित कुटुंबाला 50 लाखांची तात्काळ आर्थिक मदत द्यावी. 🔘 नितीनच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी.दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी. 🔘 कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे. 🔘 सत्ताधाऱ्यांवर टीकासत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी कुटुंबाला भेटून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणतीही ठोस आर्थिक मदत जाहीर न केल्याने ऑल इंडिया पॅंथर सेनेने याची तीव्र निंदा केली आहे. सत्ताधाऱ्यांनी राजकारण सोडून सामाजिक न्यायासाठी पुढे यावे, अशी मागणी सेनेने केली आहे.
ऑल इंडिया पॅंथर सेनेचा पाठपुरावाया भेटीवेळी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्यासह अमर लोखंडे, शरद साळवे, अविनाश हिवाळे, शैलेश आराख, खंडाळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपक केदार यांनी कुटुंबाला ठाम आश्वासन दिले की, “नितीनला न्याय मिळेपर्यंत आणि कुटुंबाला योग्य मोबदला मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”
न्यायासाठी लढा 🔘 नितीन शंकपाळ यांच्या हत्येने समाजात संतापाची लाट उसळली आहे. नितीनला न्याय मिळालाच पाहिजे, हा संदेश सर्वत्र पसरला आहे.