Uncategorized

माफी मागा अन्यथा; लोकसत्ता ला पँथर इशारा!

पुणे : लोकसत्ता ऑनलाईन पोर्टल वरुन एक पोस्ट वायरल झाली असून त्या पोस्टमुळे आंबेडकरी बौध्द समूहात संताप निर्माण झाला आहे.

गौतम बुद्ध आणि गणपती फोटो लाऊन इतिहासात गौतम बुध्द यांना विनायक नाव होते अशी दिशाभूल करणारी पोस्ट वायरल केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द बांधवांना जी प्रतिज्ञा दिली त्यात उघड उघड गौरी गणपतीला नाकारले आहे. त्यामुळे बौध्द समाज त्यांच्या प्रतिज्ञावर कायम अंमल करत आलेला आहे.

लोकसत्ता ने खोडसाळपणा केल्यानंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी लोकसत्ता ला इशारा दिलेला आहे. तात्काळ माफी मागावी, सांस्कृतिक आतंक पेरणे थांबवावे अन्यथा पँथर स्टाईल भूमिका घेतली जाईल अशा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे.

हे मत त्यांनी एक्स वर मांडले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!