चळवळ

बौध्द महिलांवर जातीय जीवघेणा हल्ला; दिपक केदार थेट गावात दाखल

अकोला | १८ सप्टेंबर : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार हे अकोल्याच्या दौऱ्यावर आले होते. सांगवी मोहाडी गावात बौध्द महिलांवर अचानक हल्ला झाल्यामुळे चार घरांची तोडफोड झालेली आहे. चार महिलांवर रॉड, कुरडीने हल्ला चडवलेला आहे. महिलांवर क्रूरपणे झालेल्या हल्ल्यात एक अल्पवयीन मुलगी सुद्धा आहे तिचा विनयभंग नराधमाने केला आहे.

घटनेचा सर्व तपशील घेऊन, सिव्हिल हॉस्पिटल अकोला येते जखमी असलेल्या पिदितेची भेट घेऊन केदार यांनी पोलीस अधीक्षक अकोला यांना कॉल करून घटनेतील आरोपींना अटक करण्याची व 307, 120 ब, पोस्को अंतर्गत कार्यवाहीची मागणी करून गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी आपल्या नेतृत्वात शांतता बैठक घेऊन घाबरून गेलेल्या बौध्द महिलांना आधार देऊन आरोपींना अटक करावी. एसपी ने तात्काळ भूमिका घेत असल्याचे सांगितले आहे.

पत्रकारांशी बोलताना दिपक केदार यांनी सांगितले की ही घटना आंबेडकरी नेता पुढे येऊन राजकीय स्पर्धक होतोय या सूड भावनेतून कटकारस्थान करत आहे. दोन्ही कुटुंबांची नार्को टेस्ट करावी सत्य बाहेर येईल कट शिजवलेला आहे. दामोधर वाघ हे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत, गावातील ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यामुळे त्यांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी, राजकीय हत्या करण्यासाठी फॅब्रिक प्रकरण तयार करण्यात आले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ली राजकारणातली क्रूरता वाढत चालली आहे, कुणी कोणत्याही स्तराला जाऊ शकतं एवढी गंभीर परिस्तिथी आहे.

स्थानिक आमदार आरोपींच्या घरी भेटल्यावर बौध्द महिलांवर हल्ला झालेला आहे. त्यामुळे राजकीय बळ असल्यामुळे हा हल्ला झाला आहे. आमच्या आया – बहिणींना भयानक मारहाण झालेली आहे. आमची मागणी आहे, तात्काळ कलमे वाढवावेत आणि आरोपीला अटक करावी अन्यथा अकोल्यात निळा जन उठाव मोर्चा काढून घटनेला वाचा फोडली जाईल अशा इशारा देत आहोत. अकोल्यात दलितांना कुणीही एकटं समजू नये अशा इशारा सुद्धा त्यांनी दिला, अशी बेधडक भूमिका त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली.

दिपक केदार यांच्या अकोल्या दौऱ्यामुळे तरुणांमध्ये मोठी ऊर्जा निर्माण झाली असून अनेकांनी यावेळी प्रवेश केले. ताकतीने पँथर वाढवण्याचा एल्गार सुद्धा यावेळी करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, सम्राट अशोक सेना प्रमुख आकाश शिरसाठ, अकोला जिल्हा अध्यक्ष परवेझ खान, अकोला जिल्हा नेते सदाशिवे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रकाश धुंदळे, नांदेड शहर प्रमुख माधव भालेराव, मनोज इंगळे, दिपक डोंगरे इत्यादी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!