कोल्हापूर : चरणदास कांबळे यांना वाढदिवसानिमित्त ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांकडून खणखणीत शुभेच्छा!

कोल्हापूर, दि. २२ जून २०२५ : ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्रातील आक्रमक नेतृत्व म्हणून ख्याती प्राप्त चरणदास कांबळे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरातील आंबेडकरवादी आणि पॅंथर कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मनुवादी आणि जातीवादी शक्तींना आव्हान देणारा हा ढाण्या वाघ, रस्त्यावरील आंदोलनांमधून अन्याय-अत्याचाराविरुद्ध लढणारा योद्धा म्हणून ओळखला जातो. त्यांच्या संघटन कौशल्याने आणि वैचारिक अभ्यासाने पॅंथर सेनेला पश्चिम महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत नवी उंची प्राप्त झाली आहे.चरणदास कांबळे यांनी आपल्या कार्यातून स्वाभिमान आणि सन्मानाचा झेंडा खांद्यावर घेऊन चळवळीला गती दिली आहे. इव्हेंट्सच्या मागे न धावता, रस्त्यावरील खऱ्या संघर्षाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याची त्यांची ताकद आणि आक्रमकता यामुळे ते बहुआयामी नेतृत्व म्हणून समोर आले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनीही फेसबुकच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.
चरणदास कांबळे यांनी यानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले, “मी एक साधा पॅंथर कार्यकर्ता म्हणून सुरुवात केली. ऑल इंडिया पॅंथर सेनेने मला संधी दिली आणि माझी छबी राज्यभर निर्माण होऊ शकली. ही संघटना कार्यकर्ते आणि नेते घडवण्याची फॅक्टरी आहे. मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो.”
सोशल मीडियावर हजारो पोस्ट्सद्वारे कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला आहे. “जय भीम!”च्या गजरात चरणदास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पॅंथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या लढवय्या वृत्तीला आणि चळवळीतील योगदानाला मानवंदना दिली. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक तरुण आंबेडकरवादी चळवळीशी जोडले गेले आहेत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, चरणदास कांबळे!