Uncategorized

भिमाकोरेगाव स्तंभ पाडा म्हणणाऱ्याला गाडून टाकू – दिपक केदार

पुणे : करणी सेना महाराष्ट्र संघटनेचा पदाधिकारी अजय सेंगर नामक दंगलखोर प्रवृत्तीच्या इसमाने भिमाकोरेगाव स्तंभ बुलडोझर लाऊन पाडण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ही लढाई जाती जाती नसून इंग्रजांविरोधात होती त्यामुळे आम्ही 1 जानेवारी ला श्रद्धांजली दिवस साजरा करू व हा उत्सव रोखण्यास येऊ अशी धमकी त्याने मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

यावर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी प्रतिक्रिया देत सज्जड दम दिला आहे. भिमाकोरेगाव स्तंभ पाडण्याची भाषा करणाऱ्यांना आम्ही गाडून टाकू. वाकड्या नजरेने बघाल तर डोळे काढून गोठ्या खेळू, हिंमत असेल तर या शेंबड्या चेंगुरने फक्त स्तंभाच्या दहा किलोमीटर अंतरावर येऊन दाखवावे मग त्याला पँथर भीमसैनिक काय असतो ते दाखवून देऊ. हे सगळं सुनियोजित सुरू आहे. आश्चर्य याच वाटतं की ज्याला नीट बसून हागता येत नाही, त्याला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केबिन मध्ये बोलवतात कसे आणि त्याच निवेदन घेतात कसे? जेंव्हा जेंव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात, तेंव्हा तेंव्हा कर्मठ हिंदुत्ववादी संघटना भीमाकोरेगाव स्तंभाला टार्गेट कसे काय करतात?

17 डिसेंबर 2017 ला याच दिवशी गोविंद गोपाळ महाराची समाधी पाडली आणि दंगलीची ठिणगी पेटली. आज पुन्हा तोच दिवस आहे, 17 डिसेंबर 2022 पुन्हा एकदा करणी सेना नामक दंगलखोर संघटनेने स्तंभ पाडण्याची आणि स्तंभावर चाल करून येण्याची धमकी दिली आहे. या तारखा पोलीस यंत्रणेने समजून घ्याव्यात आणि पुन्हा काही अनुचित प्रकार घडणार नाही याची गंभीर दखल घ्यावी.

भिमाकोरेगाव विजय स्तंभ ही आमची अस्मिता आहे, ते आत्मसन्मान, स्वाभिमानाच केंद्र आहे, ते बंड करून उठण्याच ऊर्जा केंद्र आहे, ते आमच्या शौर्यच प्रतीक आहे. त्यामुळे त्याला टच करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला गाडून टाकू अशा इशारा ऑल इंडिया पँथर सेना देत आहे.

सेंगर सारख्या प्रवृत्तीला आतंकवादी घोषित करून एक तर याचं एन्काऊंटर करावं नाही तर युएपीए ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकावे. अशा दंगलखोर प्रवृती मोकळ्या फिरता कामा नये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजकंटकांना खतपाणी घालू नये. त्यांनी निवेदन घेऊन तेच यामागचे मास्टरमाईंड आहेत की काय ही शंका निर्माण होत आहे. आजचं रेशीम बागेत सरकार जाऊन येते आणि आजच स्तंभ पाडण्याची भाषा होते, यामागे काही तरी मोठं दडलंय यात तिळमात्र शंका राहिलेली नाही.

देवेंद्र फडणवीस असे निवेदन घेऊच कसे शकतात अशा प्रश्न पडतो. आम्ही त्या स्तराला जाणार नाही पण ज्या संघाचे काही स्वयंसेवक बॉम्ब बनवले ते फोडले अशा घटनेत त्यांचं नाव पुढे आलेले आहेत तेव्हा देशात संविधान असताना बॉम्ब स्फोट करणारी संघटना ही देशविरोधी कृत्य करतंय की नाही, तेव्हा गद्दार कोण या प्रश्नांचे उत्तर समजून जाईल. बॉम्ब बनवणाऱ्या संघटनेचे केंद्र ज्या नागपुरात आहे ते केंद्र बुलडोझर ने पाडा म्हंटल्यावर खरच गृहमंत्री फडणवीस ते निवेदन घेतील का? नाही घेणार ना मग हे कर्मठ हिंदुत्ववादी संघटना दंगलीसाठी मैदानात का सोडल्यात अशी भूमिका त्यांनी मांडली असून कोणत्याही परिस्थित स्तंभ सुरक्षा वाढवली पाहिजे आणि समाजकंटक जेलमध्ये टाकले पाहिजे. अशी मागणी त्यांनी केली

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!