Uncategorized
दलित अत्याचाराविरोधात लढा तीव्र करण्याचे आव्हान – रामभाऊ दारुळे

अहिल्या नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पँथर रामभाऊ दारुळे यांनी शिर्डी दौऱ्यात कार्यकर्त्यांना भेट दिली.
या वेळी तालुका अध्यक्ष किरण भाई पवार, उपाध्यक्ष रोहित भाई अल्हट, शुभम भाई गायकवाड, रोहन भाई अहिरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांच्या सत्कार करून स्वागत करण्यात आले.
बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, संघटन बांधणी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचा आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी आता तरुणांनी संघटनेला साथ देण्याचे आव्हान रामभाऊ दारुळे यांनी केले.



