Uncategorized

विद्यार्थ्यावर मारहाण प्रकरणी पँथर सेनेचा निषेध

छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील राजेश्री प्राथमिक विद्यालयात 7 वीमध्ये शिकणाऱ्या ऋतुराज कांबळे या विद्यार्थ्यावर शिक्षक शहा यांनी अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेने तीव्र निषेध व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली आहे.

संस्थेच्या मते ही घटना फक्त मारहाणीपुरती मर्यादित नसून आरटीईमधून शिकणाऱ्या मुलांना तुच्छतेने वागवण्याची मानसिकता दर्शवते.

पँथर सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित शिक्षक तसेच शाळा चालकाविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पीडित विद्यार्थ्याला न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य प्रवक्ता व युवक अध्यक्ष बंटी दादा सदाशिवे यांनी पीडित विद्यार्थ्याला घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!