Uncategorized

दहा मिनिट उशीरा पोहोचलो असतो तर; प्रजापती लांडगेंच्या न्यायाचा लढा तीव्र झाला नसता – दिपक केदार

नांदेड : गुरुगोविंदसिंग मेमोरियल येते नर्सिंग च्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या बौध्द प्रजापती लांडगे या तरुणीला ताप आला म्हणून सहकाऱ्यांनी अडमिट केलं. चुकीचे इंजेक्शन दिले गेल्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन ती कोमात गेली, मरण पावली.
कुटुंबांनी आक्रोश सुरू केला, ते दिवसभर आक्रोश करत राहिले. पोलिसांनी प्रजापती लांडगेचा मृतदेह अक्षरशः पोस्ट मॉर्टमसाठी पळवत नेला त्याचे व्हिडिओ सुद्धा वायरल झाले. पोलिसांनी नेहमी प्रमाणे पोस्टमोर्टम आणि अंत्यविधी ची गडबड केली. आक्रोश करून करून थकलेले कुटुंब संध्याकाळी शांत झालं. गावाकडे पाचशे लोकं नातेवाईक संपूर्ण गाव अंत्यविधीच्या तयारीने बसले होते. पोस्ट मोर्टम रूम च्या बाहेर भाऊ अन् ठराविक नातेवाईक बॉडी ताब्यात घेण्यासाठी बसले होते.

न्यायाची अपेक्षा त्यांनी सोडून दिली होती, त्यादिवशी त्यांनी मेलेली यंत्रणा आणि प्रशासन पाहिले होते. किती ओरडले तरी कुणाला ऐकायला येत नव्हते, कुणाच्या संवेदना जाग्या होत नव्हत्या, कुणी माणुसकी, आपली लेकरु म्हणून त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत नव्हते. अन्याय करणाऱ्या धनदांडग्यांची ही यंत्रणा कधी होते अन् गरीबांच्या मुळावर उठते हे जणू आता नैसर्गिक झाले आहे.

ऑल इंडिया पँथर सेना लोहा तालुका अध्यक्ष प्रदीप वाघमारे, मराठवाडा सरचिटणीस अक्षय जोंधळे, नांदेड शहर अध्यक्ष माधव भालेराव यांनी ही घटना मला सांगितली.
प्रजापतीच्या भावाला मी कॉल केला, तो नुसता रडत होता, रडत रडत व्यथा सांगत होता. कसलाही विलंब न करता मी थेट त्याच्याजवळ पोहोचलो आणि पोलीस यंत्रणेला जॉब विचारला यातील आरोपी अटक का नाही? गुन्हा दाखल का केला नाही? त्याच पोस्टमोर्टम रूम बाहेरून लाईव्ह येत या प्रकरणाला राज्यव्यापी वाचा फोडली. एसपी ला चार कॉल लावले त्यांनी घेतले नाहीत, सगळ्या संशयितांचा पर्दाफाश केला आणि जाहीर केलं की आता आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाहीत जोपर्यंत ठोस भूमिका घेणार नाहीत, प्रजपतीला न्याय देण्याची निदान प्रक्रिया सुरू करत नाहीत तोपर्यंत बॉडी ताब्यात घेणार नाही. त्यानंतर कुटुंब तिथून निघून गेलं आणि आम्ही कार्यकर्त्यांना पुढील लढाईची दीक्षा ठरवून कामाला लागलो. सातत्याने जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात राहून हे आंदोलन तीव्र केले.

ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किरण फुगारे, महिला जिल्हा अध्यक्षा Adv. स्वरूपाताई भोसले, अक्षय जोंधळे, प्रदीप वाघमारे, माधव भालेराव इत्यादी कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन यांच्या सोबत चर्चा करून आंदोलनाची हाक देऊन अनेक संघटना पक्ष चळवळीतले संवेदनशील नेते कार्यकर्ते पुढे आले आणि नांदेडच्या चळवळीने हा आवाज बुलंद केला.

तोपर्यंत चार दिवस प्रजापती लांडगेची बॉडी तशीच होती. भारत माता की जय म्हणणारा आपला देश त्याच मातेची लेक चार दिवस अंत्यविधी विना निपचित पडून होती. तिला न्याय द्यावा असं कुणाला वाटतं नव्हतं. ठरवलं असतं तर काही तासात आरोपी अटक झाले असते पण मानसिकता बेटी मिटाव ची किती तीव्र आहे हे बघायला मिळाले.

दरवेळी पोस्टमोर्टम रिपोर्ट तात्काळ मिळतो त्यात एका लाईन मधे मृत्यूचे कारण लिहिलेले असते पण याच प्रकरणात ती लाईन ब्लँक होती. पोस्टमोर्टम सुरू होताना तिथे ज्या डीन च्या हॉस्पिटल मध्ये घटना घडली तो डीन तिथे येऊन गेला असल्याचे नातेवाईकाने सांगितले.

एवढी मोठी घटना घडली पण आरोग्यमंत्री आणखी व्यक्त झालेले नाहीत. त्यांनी या भारताच्या बेटीच्या दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सुद्धा दिले नाहीत. किती गाड झोपलेली आहे ही व्यवस्था…

सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाज करतो त्यातून जेवढं करता येईल तेवढं करतो, आंदोलनात्मक भूमिका घेतो, इशारा देतो, संघर्ष करतो त्यातूनच न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतो.
जे सत्तेत आहेत, जे मिडीयात आहेत, जे सत्ताधारी होणार आहेत ते चिडीचूप आहेत. त्यांच्याकडे प्रजापती लांडगे हा मुद्दाच नाही. राजकीय सत्ता, राजकीय फड, राजकीय भूमिका यापलीकडे काहीही दिसत नाही.

चार दिवसानंतर जिल्हा अधिकाऱ्यांनी लेखी पत्र देऊन आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करणे, प्रजापती लांडगे च्या भावाला शासकीय नोकरी देणे, 20 लाख रुपयांची मदत करणे या मागण्यांसाठी न्यायाची भूमिका लेखी स्वरूपात त्यांनी घेतलेली आहे. यापुढील संघर्ष न्याय अमलात आणण्यासाठी सुरू केला जाईल…
त्यासाठी झुंज देणाऱ्या सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांना जयभीम!

#JusticeForPrajapati

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!