Uncategorized

धुळे महानगरात ऑल इंडिया पँथर सेनेची ताकद वाढली!

धुळे : अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात लढणारी तसेच वंचित, शोषित समाजघटकांना न्याय मिळवून देणारी अग्रगण्य सामाजिक संघटना ऑल इंडिया पँथर सेना आता धुळे महानगरात आणखी बळकट झाली आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक पँथर दिपक भाई केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच महाराष्ट्र युवक अध्यक्ष बंटी भाई सदाशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली, धुळे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांच्या नेतृत्वात,सामाजिक कार्यकर्ते आयु. शुभम भाऊ वानखेडे यांची धुळे महानगर प्रमुख म्हणून अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती म्हणजे धुळे शहरातील वंचित समाजबांधवांच्या हक्क, अधिकार आणि न्यायासाठी लढा देण्याची एक मोठी जबाबदारी आहे. पँथर सेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा हा ऐतिहासिक निर्णय असून, धुळे महानगरात अन्यायाविरुद्ध लढण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने शुभम भाऊ वानखेडे यांना हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!

ऑल इंडिया पँथर सेना धुळे जिल्हा युनिट

जॉइन ऑल इंडिया पँथर सेना धुळे

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!