Uncategorized

शहीद विनोद पवार यांच्या निधनावर तीव्र प्रतिक्रिया!

बुलढाणा : ऑल इंडिया पँथर सेनानांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील लढाऊ नेता विनोद पवार यांचा मृतदेह तब्बल 30 तासानंतर सापडला. हा प्रकार धक्कादायक असून ही प्रशासनिक हत्या आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केली.

केदार यांनी स्पष्ट मागणी केली की –जिल्हाधिकारी पासून जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.

शहीद विनोद पवार यांच्या कुटुंबाला 1 कोटींची शासकीय मदत द्यावी.कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी.विनोद पवार यांच्या बलिदानाचे स्मरण करताना दिपक केदार म्हणाले, “मला पोहता येत नाही पण बलिदान गरजेचं आहे” म्हणत त्यांनी उडी घेतली आणि स्वतःचे प्राण अर्पण केले. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. राज्य सरकारने आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहावे.

शहीद पवार यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाल्याचेही त्यांनी नमूद केले. “संपूर्ण आयुष्य मिशनसाठी वाहून, लढत-लढत आयुष्याचा शेवट करणाऱ्या या कार्यकर्त्याला अखेरचा जयभीम! त्यांच्या त्यागाला संपूर्ण समाज सलाम करतो. राज्यातील बांधवांनी त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा,” असे आवाहनही त्यांनी केले.

शहीद विनोद पवार यांच्या बलिदानामुळे चळवळीला नवीन उर्जा मिळेल, असे दिपक केदार यांनी ठामपणे सांगितले.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!