चळवळ
मजुरी मागितली; दलित युवकाच्या गळ्यात चपल्लांचा हार, तोंडात लघवी करून 5 तास डांबून मारहाण!

राजस्थान, सोरोही : पेशाने इलेक्ट्रिसियन असलेल्या दलित युवकाने आपल्या कामाची मजुरी मागितली म्हणून जातीयवादी गुंडांनी त्याला 5 तास डांबून मारहाण केली, गळ्यात हार घातला आणि त्याच्या तोंडात लघवी करण्याचे अतिशय गलिच्छ कृत्य केले आहे. एवढंच नाही तर त्याचा व्हिडिओ शूट करून तो वायरल सुद्धा करण्यात आला आहे. राजस्थान मध्ये सर्वात जास्त दलित अत्याचार वाढले आहेत.
या घटनेची माहिती ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी ट्विट करून दिलेली आहे त्यांनी यावेळी राजस्थान सरकारचा निषेध केला असून ऑल इंडिया पँथर सेना देशव्यापी आंदोलन छेडेल अशा इशारा त्यांनी दिला आहे.
कोणत्या देशात आम्ही राहतोय आजही आम्हाला माणूस म्हणून जगू दिले जात नाही.