चळवळ
बौध्द मुलीचे विष पाजून दीक्षा हत्याकांड प्रकरण ऑल इंडिया पँथर सेना हिंगोली टीम तात्काळ पोहोचली दिक्षाच्या घरी…

हिंगोली : आज दिनांक २७ जुलै २०२२ रोजी म्हाळशी ता. सेनगाव जिल्हा हिंगोली येथे प्रेमप्रकरणातून विषप्रयोग करून हत्या करण्यात आलेल्या दिक्षा यांच्या घरी भेट देऊन घरच्यांचे सांत्वन केले. तसेच प्रकरणाविषयी सखोल माहिती घेऊन चर्चा केली. पोलिस प्रशासनाने पुरावा मिळणार नाही, सिद्ध होणार नाही म्हणून पीडितेच्या वडिलांना फिर्याद बदलण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली आहे. त्यामूळे 302 च्या ऐवजी 306 कलम लावण्यात आले आहे.
पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाल्यावर आरोपींवर 302, 376 चा गुन्हा दाखल करू, त्याचप्रमाने डॉ. शिंदे यांना पोलिसांना माहिती न देणे, त्याचप्रमाणे वैद्यकीय उपचारात हलगर्जीपणा करणे, यासाठी त्यांनाही सह-आरोपी करणे, त्यासाठी आवश्यक ती कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेना हिंगोली जिल्हाप्रमुख राहुल भाऊ पूंडगे , युवा नेते नितीन भाऊ खिल्लारे, हिंगोली ता. अध्यक्ष सूर्या भाई इंगळे, सुनील कांबळे, अमोल भोकरे, रवी पंडित, तथागत इंगळे इ. उपास्थित होते.