Uncategorized

रमाई घरकुल आवास योजनेची लाभार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली रक्कम परत शासनाला पाठवल्यास रस्त्यावर उतरू : विकास रोडे गंगाखेड तालुकाध्यक्ष, ऑल इंडिया पॅंथर सेना

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या ६०० कोटींच्या कामांना स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातून विकासकामांना दिलेला निधी स्थानिक कार्यालयांमार्फत शासनाला परत पाठवला जात आहे. याचाच भाग म्हणून गंगाखेड शहरातील रमाई घरकुल योजनेची लाभार्थ्यांसाठी उपलब्ध झालेली रक्कम नगर परिषदेमार्फत परत राज्य सरकारला पाठवली जाऊ शकते हे लक्षात आल्यानंतर ऑल इंडिया पँथर सेनेचे गंगाखेड तालुका अध्यक्ष विकास रोडे यांनी तत्काळ नगर परिषदेला निवेदन देत घरकुलाला उपलब्ध झालेली रक्कम परत पाठवू नये ही मागणी केली आहे, तसेच उपलब्ध झालेली रक्कम परत शासनाला पाठवल्यास रस्त्यावर उतरू असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.
यावेळी उपस्थित, संतोष हनवते(सामाजिक कार्यकर्ते), अविनाश जगतकर (सामाजिक कार्यकर्ते), रोहिदास लांडगे (महाराष्ट्र जनक्रांती सेना) व ऑल इंडिया पँथर सेनेचे तालुका पदाधिकारी.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!