ग्रामीण भागात बस फेऱ्या सुरू करा – ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी


ऑल इंडिया पॅंथर सेना अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुका च्या वतीने,बस चालू करण्याबाबत ऑल इंडिया पँथर सेना मुर्तिजापूर तालुका यांच्या वतीने बस चालू करण्यासाठी निवेदन दिले, रामटेक, मंडुरा मार्गे नवसाळ तसेच मुर्तिज़ापुर मार्गे मधापुरी,कुरुम,तसेच मुर्तिजापूर अमरावती अड्नेरि बस थांबा हे निवेदन पँथर च्या वतीन देण्यात आले, शाळेकरी मुले हॉस्पिटल ला जाण्यासाठी रुग्णांचे खूप हाल होत आहे,. विद्यार्थी वेळेवर शाळेत जाऊ शकत बस फेऱ्या बंद असल्यामुळे खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट होत आहे. प्रवाशांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्वरित बस फेऱ्या सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅंथर सेना मुर्तीजापुर तालुक्याच्या वतीने देण्यात आले. लवकरात लवकर या गंभीर बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. अकोला जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र सदांशिव जिल्हा कायदेशीर सल्लागार एडवोकेट अमोल तायडे.. मुर्तिज़ापुर टिम,तालुका अद्य्ंक्ष,मंगेश बागडे, ता,सचिव रफ़ीक शहा,ता,महासचिव सचिन ठवरे,ता,सम्पर्क प्रमूख जीवन भगत ता,संघटक भावेश किर्दक,मुर्तिज़ापुर शहर अदयक्ष साबिर शहा,नवसाळ शाखा संघटक ,विपुल जामनीक हे उपस्तित होते..