
प्रतिनिधी: आज दिनांक 7/7/22 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे ऑल इंडिया पँथर सेनेतर्फे जिल्हाध्यक्ष इंडीयन लेडी शीतल गजभिये मॅडम यांच्या नेतृत्वाखाली महागाई, बेरोजगारी विरोधात तीव्र निषेध करण्यात आला. महागाई कमी झाली पाहिजे,तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे कारण दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत आहे यामुळे तरुण गुन्हेगारी कडे वळत आहे, महागाई वाढल्यामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत असे वक्तव्य शीतल गजभिये यांनी केले. तसेच यावेळी तीस्ता सेटलवाड समर्थन, केरळचे मंत्री साजी चेरीयन निषेध, व लोकशाही वाचवा इत्यादी फलक कार्यकर्त्याच्या हाती दिसले. महागाई कमी करा, रोजगार द्या, इंकलाब जिंदाबाद इत्यादी नारे देण्यात आले तसेच यावेळी रुपेश कुत्तरमारे,सुरेश मेश्राम,सुनीता रायबोले, वर्षा आकोडे,अतुल मसूले, ऑल इंडिया पँथर जिल्हाध्यक्ष इंडीयन लेडी शीतल गजभिये,गोपाल ढेकेकर ,शुभम रामटेके,प्रकाश अंभोरे इत्यादी अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.