Uncategorized

बीड : दौनापूर येथील बौद्ध बांधवांचे आंदोलन; डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी प्रवेशद्वाराची मागणी!

परळी तालुका, बीड जिल्ह्यातील दौनापूर येथील बौद्ध बांधवांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रवेशद्वार (कमान) उभारण्याच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. या आंदोलनाला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते तथा बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी भेटून पाठींबा दिला.

यावेळी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक भाई केदार यांनी आंदोलनकर्त्यांशी फोनवर संवाद साधत मार्गदर्शन केले आणि पूर्ण समर्थन दर्शवले.आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे की, दौनापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रवेशद्वार उभारण्यास प्रशासनाने तात्काळ परवानगी द्यावी. त्यांनी जिल्हा प्रशासनाला या मागणीची दखल घेऊन त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या पाठिंब्यामुळे या आंदोलनाला व्यापक समर्थन मिळत आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला सामाजिक सलोखा राखण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

बीड जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!