Uncategorized

माननीय दीपक भाई केदार या नावाला आज सर्व जाती धर्माचा माणूस मोठ्या प्रमाणात मानायला लागला आहे.

हे सामाजिक परिवर्तन असचं उभा राहिलेले नाही. त्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्या संघर्षात संविधानाची एकात्मता व समतेची पात्रता दडलेली आहे. त्यांनी जात धर्म न जुमानता सर्व जाती धर्मातील सोशीत पिडीत वंचित वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी रोज रस्त्यावरचा लढा निधड्या छातीने पँथर म्हणुन दिला. दीपक भाई केदार कोण ? ह्या प्रश्नाचे उत्तर ह्याचं नावात मिळाले. त्यामुळे जाणिवांच्या या व्यक्तिमत्त्वा कडून इथल्या प्रस्थापितांचे बुड हलविण्याची क्षमता नवीन क्रांतीच्या दिशेने असेल आणि हिचं नवी क्रांती मोठा राजकिय हादरा निर्माण करणारी असणारं..बऱ्याचदा आम्ही हॉटेल वर ज्या त्या जिल्ह्यात कार्यक्रमासाठी गेल्यावर जेवणासाठी थांबतो. मराठा समाजातील तरुण वर्ग मोठ्या आपुलकीने ” आमच्यासाठी लढणारे योद्धे दीपक भाई तुमचा गर्व आहे म्हणत जेवणाचे बिल नाही म्हणाल्यावर पण अदा करतो’. असे अनेकदा घडते चांद्यापासून ते बांध्या पर्यंत रोजाना थांबत असणाऱ्या छोट्या चाय टपरी, नाका, चौहाटावर मोठ्या तळमळीने सर्व समाजातील तरुण वर्ग आपल्यासाठी लढणारे आपले दीपक भाई केदार तुम्हीचं म्हणतो, समतेची स्तुती धरतो त्यांनी केलेली ही एकात्मतेचा स्तुती विश्वासनिय भाव देते. हा विश्वास दीपक भाई यांनी मोठ्या संघर्षातून समाजा समाजात रुजविला आहे. त्या विश्वावर आता नवं क्रांती नक्कीचं जन्म घेईल असा माझा ही विश्वास आहे.संघर्षयोध्या, क्रांतिकारी, संघर्षनायका कडून सामाजिक कार्यातून सर्वांनी धरलेली न्यायिक आपेक्षा लवकरचं राजकिय वाटचालीत प्रगल्भपणे शिक्का मोर्तब करणार असा दावा मी ठामपणे व्यक्त करतो!!जयभीम#AllindiaPantherSena महाराष्ट्र प्रवक्ता तथा युवक अध्यक्ष, महाराष्ट्र-बंटी दादा सदाशिवे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!