Uncategorized

ऑल इंडिया पँथर सेना नाशिक जिल्हाध्यक्षपदी प्रशांत भाई पगारे यांची निवड!

नाशिक, दि. २२ जुलै २०२५: ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी नाशिक येथे कार्यकर्त्यांशी धावत्या भेटीत आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते प्रशांत भाई पगारे यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. विश्रामगृह, नाशिक येथे झालेल्या या बैठकीत पगारे यांना नियुक्तीपत्र देऊन संघटनेत स्वागत करण्यात आले. यावेळी ओबीसी नेते दीपक हेंबाडे यांना जिल्हा सदस्यपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत संघटनेची वाटचाल सुरू केली आहे. येत्या आठ दिवसांत नाशिकमध्ये शेकडो नवीन प्रवेश पत्रकार परिषदेत जाहीर केले जाणार असून, महिनाभरात भव्य मेळावा घेऊन संघटनेची ताकद दाखवण्याचा निर्धार या बैठकीत घेण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र नेते बंटी थोरात आणि सागर भालेराव उर्फ नाना यांनी दीपक केदार यांचे स्वागत केले, तर पँथर अविनाश हिवाळे यांनी सर्वांचे संघटनेत स्वागत केले.

नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र असून, ओझर विमानतळाला दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी संघटना लवकरच ठोस भूमिका घेणार आहे. तसेच, अत्याचाराविरोधात लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी मजबूत करण्याचा अजेंडा निश्चित करण्यात आला.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!