सुषमा अंधारे ना शिवीगाळ करणारा व्हिडिओ वायरल

पुणे : काही वर्षांपूर्वी सुषमा अंधारे यांनी प्रबोधन करत असताना संताबद्दल वैज्ञानिक दृष्टीतून काही मत जाहीर सभेतून मांडली होते.
अचानक जुना व्हिडिओ काढून त्याचा निषेध केला जात आहे. अतिशय खालच्या पातळीच्या टीका केल्या जात आहेत.
फेसबुकवर अभिमन्यू महाराज आंधळे या खात्यावरून सौ सूनिताताई आंधळे महाराज नामक कीर्तनकार महिलेने सुषमा अंधारे यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आहे. एवढंच नाही त्या दिसतील तिथं त्यांना मारण्याची धमकी देऊन चीतवणी सुद्धा दिलेली आहे.
या संदर्भात ऑल इंडिया पँथर सेनेनी पँथरनामा शी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी या धमकी देणाऱ्यांना राज्य सरकारने आवर घालण्याची मागणी केली आहे. देवी देवतांचा अवमान झाला म्हणून कांगावा करून सुषमा अंधारेंची खुलेआम हत्या करणार आहात का? खुलेआम त्यांना मारण्याची धमकी देणे निंदनीय आहे. तत्वाच विचारच भांडण मनुवादी कधीच लढत नाहीत कारण त्यांच्याकडे उत्तर नसते, तत्व आणि तथ्य सुद्धा नसतात. ज्या स्वयंघोषित चिठवणीखोर सुनीता महाराज आहे त्यांनी भान ठेवावं त्या एका दलित महिलेला टार्गेट करत आहेत, जयभीम नारा देणारी क्रांतीकारी सुषमा अंधारे यांना एकटं समजू नका अशा इशारा आम्ही देत आहोत. सुनिता महाराज तुम्ही आज जे बोलताय कीर्तन करताय ती महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देणं आहे याचं भान ठेवा मनुस्मृती जाळली म्हणून आज त्या स्वतंत्र आहेत. कुणाचे उपकार मानायचे आणि कुणासाठी भांडायचे याचं भान ठेवा. चुकूनही आम्हाला भूमिका घेइला भाग पाडू नका. पुरावे, तथ्य, तत्व, विचाराची लढाई विचाराने करा अन्यथा सुषमा अंधारे ना एकटं समजू नका असे आवहन त्यांनीं केले आहे.