पँथर दणका: येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील अतिक्रमणावर कारवाई

येवला: अनेक वर्षांपासून येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील अनाधिकृत पार्किंग आणि अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी होती. ऑल इंडिया पँथर सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे अखेर येवला नगरपरिषद आणि पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले.
या प्रश्नावर तोडगा काढत येवला नगरपरिषद आणि येवला शहर पोलिस ठाण्याने पुतळा परिसराला ‘नो पार्किंग’ म्हणून घोषित केले आहे. तसेच, तेथे ‘नो पार्किंग’चा फलक लावण्यात आला आहे. याशिवाय, वारंवार होणारी अस्वच्छता रोखण्यासाठी परिसरात उंच काँक्रीट बांधकाम करण्याचे आश्वासन नगरपरिषदेने दिले आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे आंबेडकरी जनतेत उत्साहाचे वातावरण आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, आंबेडकरी एकजुटीचा विजय असो, ऑल इंडिया पँथर सेनेचा विजय असो!” अशा घोषणांनी परिसर दणाणला आहे.
पँथर सेनेचे नेते दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाला सलाम करत कार्यकर्त्यांनी “दीपक भाई केदार, तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है!” असा जयघोष केला.
आंबेडकरी चळवळीचा हा विजय येवला येथील सामाजिक न्यायाच्या लढ्याला नवी दिशा देणारा ठरला आहे.