Uncategorized

लातूर-औसा रस्त्यावरील भीषण अपघातात माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे निधन!

लातूर, दि. २६ मे २०२५: आज दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास लातूर-औसा मार्गावरील बेलकुंड गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते आर. टी. देशमुख (जिजा) यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आर. टी. देशमुख हे आपल्या चारचाकी वाहनातून औसाकडे प्रवास करत होते. बेलकुंडजवळील उड्डाणपुलापाशी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला असून, देशमुख यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाला, परंतु वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आर. टी. देशमुख यांनी माजलगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत असताना विकासकामे आणि समाजसेवेत मोलाचे योगदान दिले. त्यांचा सौम्य स्वभाव, प्रामाणिकपणा आणि जनसामान्यांशी असलेली जवळीक यामुळे ते नेहमीच लोकप्रिय होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.

ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी सोशल मीडियाद्वारे देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आहे. त्यांनी देशमुख यांचा उल्लेख “समाजसेवी, मनमोकळे व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांचा नेता” असा करत त्यांच्या निधनाने एक प्रगल्भ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. तसेच, बीडचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनावणे यांनीही बीड जिल्ह्याच्या वतीने जिजा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

या दु:खद घटनेमुळे त्यांच्या कुटुंबीयांसह संपूर्ण मराठवाड्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि कुटुंबियांना हे दुख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना.

भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली!

#RTDeshmukh #Latur #Shraddhanjali

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!