
परभणी : हर घर तिरंगा मोहीम जोरात सुरू आहे. ग्रामीण भागात राष्ट्रध्वज वाटप होत आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ मध्ये एक गठ्ठा खोलला आणि त्यात राष्ट्रध्वजावर भाजप चे नाव आणि चिन्ह दिसले. एवढंच नाही तर झेंड्याचा रंग देखील बदललेला आहे . स्थानिकचे युवक काँग्रेस अध्यक्ष व भारतीय नागरिक सतर्क झाले त्यांनी
तात्काळ बीडियो, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला त्यांनी अंग झटकले, पोलीस स्टेशनला तक्रार दिली, पोलीस तक्रार घेत नाहीत. आता हे प्रकरण जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलेले आहे. कार्यकर्ते जिल्हा अधिकाऱ्यांकडे गेल्याचे समजत आहे.
ऑल इंडिया पँथर सेनेचे परभणी जिल्हा अध्यक्ष निवृत्ती वाघमारे यांनी या घटनेचा निषेध केला असून तात्काळ देशद्रोही अटक झाला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. हे छपाई कंपनीत घडले की स्थानिक पातळीवर घडले याचा शोध घ्यावा. अनेक झेंड्यात अशोक चक्राची जागा बदलेली आहे. छपाई कंपनीत घडले असेल तर तात्काळ या कंपनी मालकावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. कुठेही पक्षाचा प्रचार करायलa निघालेल्या या प्रवृती जाणिवपूर्वक देशाच्या राष्ट्रध्वजाशी खेळत आहेत. राष्ट्रध्वज नाकारणारे अचानक राष्ट्रध्वज प्रेमी झालेले आहेत ते केवळ प्रेमाचं नाटक करत आहेत. त्यांच्या ओटात एक अन् पोटात एक आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि जबाबदार सर्व अधिकाऱ्यांचे निलंबन झालं पाहिजे. एक न एक झेंडा तपासून ग्रामीण भागात पाठवणे हे जिल्हाधिकारी यांचे कर्तव्य आहे. पण निष्क्रिय, निष्काळजीपणा देशाची विटंबना करतोय याच भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. सोनपेठ प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करा अशी आमची भूमिका असल्याचे मत परभणी जिल्हा अध्यक्ष निवृत्ती वाघमारे यांनी व्यक्त केले.