अग्रलेख

अभिनेत्री निळ्या टोपीत, दोन मिनिटात फोटो वायरल!

पुणे : सुप्रसिद्ध अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने आज आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन निळी टोपी घातलेला फोटो शेअर केला आहे. अवघ्या दोन मिनिटात जयभीम JayBhim comment ने धुमाकूळ घातला आहे.

सोशल मीडियात आंबेडकरी तरुण मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. फिल्म इंडस्ट्री मध्ये जात लपवणे, आडनाव बदलणे हे सुरू असते. राजेश्वरी खरात हिने निळी टोपी घालून जो फोटो वायरल केला आहे तो आत्मसन्मान जिवंत असल्याचे संकेत दर्शवत आहेत.

फॅन्ड्री चित्रपट मधील ही सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. झब्या अन् तिची जोडी, चिमणी ची राख करून हिच्या अंगावर फेकण्याची ती धडपड आणि गावातली जातीय व्यवस्था त्यातून होत असलेकी सामाजिक गुलामी दर्शवणारा नागराज मंजुळे यांचा हा चित्रपट होता.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02mXzCr3UwWY3ayA7vUSxmfpEVXBAu753bk8BhhpTiYZ5QarWX8QzzHCo7QBr7cMBwl&id=100044631000266&sfnsn=wiwspmo&mibextid=RUbZ1f

या अभिनेत्रीला पुन्हा संधी मिळाली नाही, झब्या तर कुठे तरी हमाली करतोय अशी मागे बातमी आली होती. मध्ये पुन्हा झब्या झुंड मध्ये दिसला राजेश्वरी खरात मात्र पुन्हा नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात दिसली नाही. तिला का डावलेले हा प्रश्न महत्वाचा आहे. तिने स्वबळावर आपलं अस्तित्व सिद्ध करायला सुरवात केली. ती नागराज मंजुळे यांच्या वर्ग मैत्रिणीची पोरगी नव्हती त्यामुळे सैराट मधील आर्ची टिकली पण खरात टिकू शकली नाही.

तिचं खरात असणं आढाव आलं की तिचं स्वाभिमानी असणं आढाव आलं हा प्रश्न आहे. तिने तिच्या पायावर पुन्हा जो संघर्ष केला त्याला सलाम आहे. आजच्या तिच्या फोटोन आंबेडकरी सोशल मीडिया ॲक्टिविस्ट चे मन जिंकले आहे.

#PANTHERNAMA

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!