पुण्यात महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीवर कठोर कारवाईची मागणी!

पुणे | प्रतिनिधीपुणे शहरातील पर्वती परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ५० वर्षीय व्यक्तीने एका महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना आजही सुरक्षित वातावरण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात असून अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.या प्रकरणी ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र राज्य संयोजक तथा नांदेड जिल्हाध्यक्ष माधव भालेराव यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. “आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी. महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी,” अशी मागणी त्यांनी केली.“ही घटना केवळ एका महिलेवरचा अन्याय नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा प्रवृत्तीविरोधात समाजाने एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज आहे,” असेही भालेराव यांनी म्हटले आहे.



