निवडणुकांसाठी ऑल इंडिया पॅंथर सेना सज्ज!

सातारा : साताऱ्यात झालेल्या ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या महाराष्ट्र कोर कमिटीच्या बैठकीत निवडणुकांची रणनीती आखण्यात आली. सातार्यातील विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांवर व्यापक चर्चा झाली. पुण्यात लवकरच राज्यव्यापी कार्यकर्त्यांची भव्य बैठक घेण्याचा निर्णय यावेळी जाहीर करण्यात आला.
पँथर सेना आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली असून, सामाजिक आंदोलनातून निर्माण झालेलं हे संघटन आता ठामपणे राजकीय आयामाकडे वाटचाल करत आहे. राज्यात सर्वसामान्य, शोषित, वंचित घटकांचा आवाज म्हणून पँथर सेनेची ओळख तयार झाली आहे. निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी संख्या पुढे येत असून, संघटना या इच्छेला रचनात्मक व संस्थात्मक दिशा देण्यास सिद्ध असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश भाई जगताप, विदर्भ अध्यक्ष दादाराव ढोले, महाराष्ट्र प्रवक्ते नितीन सोनवणे आणि कॉर्डिनेटर अविनाश हिवाळे उपस्थित होते.



