Uncategorized

संघर्षातून घडलेली मैत्री; बच्चुभाऊ कडूंकडून दीपक केदार यांना शुभेच्छा!

ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांना प्रहार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दिव्यांग आणि शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांनी फोनद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

दीपक केदार आणि बच्चुभाऊ कडू हे दोघेही संघर्षातून पुढे आलेली व्यक्तिमत्त्वे आहेत. शेतकरी आंदोलनाच्या काळात केदार यांनी बच्चुभाऊ कडूंच्या लढ्याला भक्कम पाठिंबा दिला होता. परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून झालेल्या युतीतूनही दोघांची एकजूट अधिक दृढ झाली आहे.

केदार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत अन्याय-अत्याचाराविरोधातील त्यांच्या लढाऊ भूमिकेचे कौतुक करत बच्चुभाऊ कडू यांनी “आपण सोबत राहून कष्टकरी, शेतकरी, शोषित, कामगार, दिव्यांग, दलित, आदिवासी, बहुजन यांच्या न्यायहक्कासाठीचा लढा आणखी तीव्र करू” अशी ग्वाही दिली.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!