Uncategorized
युवराज संभाजी राजेंकडून दीपक केदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

पुणे : ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांना माजी खासदार आणि स्वराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष युवराज संभाजी छत्रपती राजे यांनी दूरध्वनीद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
महाराजांनी केदार यांच्या आतापर्यंतच्या राजकीय व सामाजिक कार्याचे कौतुक करत, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. “तुमचे कार्य समाजहिताचे असून, असेच निष्ठेने काम करत राहा,” असे संदेश देत त्यांनी आशीर्वाद दिला.
या शुभेच्छांबद्दल दीपक केदार यांनी महाराजांचे मनःपूर्वक आभार मानले.-



