शहीद सोमनाथला न्याय मिळेपर्यंत संघर्ष तीव्र – लॉन्ग मार्च संघर्ष समितीचा रास्ता रोको!

परभणी : येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लॉन्ग मार्च संघर्ष समिती तर्फे भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व आशिष वाकोडे आणि माजी महापौर सोनकांबळे यांनी केले.आंदोलकांनी स्पष्ट भूमिका घेतली की, “परभणी संविधान विटंबनेच्या प्रकरणात जोपर्यंत पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही.” अशोक घोरबांड व त्याच्या टोळीवर खुनाचा गुन्हा दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करत, रस्त्यावरच्या संघर्षातून लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
ऑल इंडिया पँथर सेनेने या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला आहे. घोषणाबाजीदरम्यान आंदोलकांनी आवाज उठवला
–“सोमनाथ हम शरमिंदा हैं, तेरे कातील जिंदा हैं!”
हे आंदोलन परभणीतील न्यायासाठी चाललेल्या लढ्याला नवी उर्जा देणारे ठरले आहे.



