महाराचा बैल तोरणाखाली नको म्हणत बौध्द वृध्द महिलांना जातीयवादी गावगुंडांनी केली जबर मारहाण!

बुलढाणा : तालुका मेहकर, मोळा मोळी गाव येते काल पोळा सणानिमित्त सर्व गावकरी पोळा साजरा करत होते. तोरणाखाली महाराचा बैल नको म्हणत काही जातीयवादी गावगुंडांनी विरोध केला. जातीयवादी शिवीगाळ करत काठ्याने मारहाण करण्यात आली. व्हिडिओ मधील लाल शर्ट आणि पांढरा शर्ट काळी पँट असे दोघे तिघे दिसत आहेत. अनुसूचित जातीच्या वृद्ध, महिलांना मारलेले दिसत आहे. उघड उघड यात बेदम मारहाण करून जीवघेणा हल्ला केलेला आहे.
जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे, बड्या जातीयवादी लोकप्रतिनिधीचे हे कार्यकर्ते आहेत. त्यांना जातीची, सत्तेची मस्ती चडलेली आहे. आमच्या आया बहिणींना खाली पाडून मारहाण केली जात आहे.
ऑल इंडिया पँथर सेना निषेध करत असून पोलीस अधीक्षकाने तात्काळ या जातीयवादी गावगुंडांना अटक करावी. त्यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट, 354 विनयभंग अंतर्गत कार्यवाही करावी. पीडितांना बौध्द वस्तीला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावे.