Uncategorized
श्याम मानव बौध्द धम्माची वाट धरा तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही!

पुणे : बागेश्र्वर नामक महाराजाच्या चमत्काराचे सत्य जाणून घेण्यासाठी 30 लाख रुपये अंधश्रद्धा निर्मूलन अध्यक्ष श्याम मानव यांनी चॅलेंज जाहीर केलं. त्यानंतर एकच चर्चा झाली आणि हे प्रकरण सर्व मीडियातून प्रकाशझोतात आलं.
हा आरोप सनातन धर्मावर असल्याचा कांगावा त्याने केला आणि त्यानंतर कर्मठ आतंकी संघटनांच्या रडारवर श्याम मानव आले आहेत त्यांना धमकी आलेली आहे. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली त्याचं धर्तीवर श्याम मानव यांच्यावर सुद्धा प्रयोग सुरू आहेत.
यावर प्रतिक्रिया देताना ऑल इंडिया पँथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी ट्विट करून बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. श्याम मानवाने बुद्ध वाटेवर चालावे कारण या जगात देव ईश्वर नाही, चमत्कार नाही हे बोलणारे बंड करणारे पहिले बुद्ध होते. त्या अनुषंगाने केदार यांनी खालील प्रतिक्रिया दिली.