दीपक केदार यांच्यावरील बदनामीचा प्रयत्न अयशस्वी; तरुणाने मागितली माफी, ऑल इंडिया पॅंथर सेनेने दाखवली सामंजस्याची भूमिका!

सामंजस्याची भूमिका** ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांची इंस्टाग्रामवर ‘एम बी ओवन रायटर’ नावाच्या अकाउंटवरून बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्याचा प्रयत्न झाला. या पोस्टमध्ये आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर आणि दिपक केदार यांचे फोटो वापरून आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता.
मात्र, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यावर आलेल्या समर्थनात्मक प्रतिक्रिया आणि कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला.
या प्रकरणात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते बंटी दादा सदाशिव यांनी सायबर क्राइम विभागाकडे तक्रार दाखल करून फेक अकाउंटचा खरा वापरकर्ता शोधण्याची मागणी केली होती. परंतु, सामंजस्याची भूमिका घेत, त्यांनी संबंधित तरुणाशी संवाद साधला. या संवादात त्या तरुणाने आपली चूक मान्य केली आणि भविष्यात असे कृत्य न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्याने बदनामीकारक पोस्ट डिलीट केली.
या तरुणाला स्वतःच्या कृत्याची लाज वाटल्याने त्याने दीपक केदार यांचे कार्य चांगले असल्याचे मान्य करत माफी मागितली आणि आता तो ऑल इंडिया पॅंथर सेनेबरोबर काम करण्यास तयार आहे.
बंटी दादा सदाशिव यांनी सांगितले की, “आम्ही टीकेचे नेहमी स्वागत करतो, परंतु खालच्या पातळीवरील शिवीगाळ आणि बदनामी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही कधीही कार्यकर्त्यांना फेक अकाउंट्स बनवून बदनामी करण्यास प्रोत्साहन देत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार, चळवळीत पारदर्शकता आणि सत्याला महत्त्व आहे. खोटा प्रचार धोकादायक आहे, आणि आम्ही कार्यकर्त्यांना त्याग आणि संघर्षाची शिकवण देतो.
महाराष्ट्राचे प्रवक्ते नितीन सोनवणे यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, “दीपक भाई केदार यांच्याविरोधात सोनियोजितपणे बदनामीचे कट रचले जातात. पण आमच्या संघटनेला आणि नेत्यांना याचा कोणताही परिणाम होत नाही. आम्हाला उत्तर देण्यापेक्षा तरुणांनी आपले आयुष्य शिक्षण आणि चळवळीत घालवावे. आम्ही लवकरच फेक अकाउंट्स आणि बदनामीच्या प्रयत्नांविरोधात कायदेशीर टीम तयार करणार आहोत.”
औरंगाबाद जिल्ह्याचे युवा अध्यक्ष अविनाश हिवाळे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कायदेशीर कार्यवाहीचा इशारा दिला. ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या आयटी पथकाने सतर्क राहण्याचे आणि परिवर्तनाच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
दीपक केदार यांनी याबाबत सांगितले, “अशा पोस्ट्स आणि ट्रोलिंगची आता सवय झाली आहे. पूर्वी याचा मानसिक परिणाम व्हायचा, पण आता मी याकडे लक्ष देत नाही. विरोधकांचे स्वागत आहे, पण बदनामी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मनुवाद्यांविरोधात आणि समाजाच्या हक्कांसाठी लढतो, पण चुकीच्या मार्गाने नाही. सत्य आणि पारदर्शकता हेच आमचे धोरण आहे.”
या घटनेनंतर शेकडो कार्यकर्त्यांनी दीपक केदार यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया दिल्या आणि ‘जय भीम’चा जयघोष केला. ऑल इंडिया पॅंथर सेनेने सामंजस्य आणि परिवर्तनाच्या मार्गावर भर देत एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे.
✅ पँथरनामा



