महापुरुषांपेक्षा कुणीही मोठा नाही, सगळ्यांने वापरले ठाकरे, पँथरने नाकारले ठाकरे!

चिंचवड : विधानसभा पोटनिवडणुकीत ऑल इंडिया पँथर सेनेनी मोठी आघाडी घेतली आहे. अनेकांनी प्रचार कँपैगनिंग केली यात प्रकर्षाने सगळ्यांच्याच बॅनर, पोस्टर, होर्डिंग्ज, सोशल मीडिया डिजाइन यावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरला आहे. भाजप, महविकास आघाडी, अपक्ष उमेदवार यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो टाकला एकमेव ऑल इंडिया पँथर सेनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार किशोर आत्माराम काशीकर यांच्या कँपैगनिंगवर महापुरुषांचे मोठे फोटो असून ठाकरेंना त्यांनी नाकारले आहे.
यावर दिपक केदार यांनी सांगितले की, राजकारणासाठी विचारधारा आम्ही बाजारात मांडलेली नाही. आम्ही आमच्या कँपैगनिंग वर महापुरुषांना महत्व दिले आहे, जे समानता, समता, मानवता विचाराचे पुरस्कर्ते होते. ज्यांनी दंगली घडवल्या, ज्यांनी मुस्लिमांना जाणिवपूर्वक टार्गेट केलं, ज्यांचा नामांतर दंगलीत रोल आहे, कर्मठ हिंदुत्व ज्यांनी महाराष्ट्रात आणून येते पुरोगामी विचारधारा उद्धवस्त केली त्यांची विचारधारा आमच्याकडे चालत नाही.
पँथर आहोत, स्वाभिमानी आहोत, निळा रंगाची कँपैगनिंग बाबासाहेबांसहित आम्ही टिपू सुलतान यांचा सुद्धा फोटो वापरलेला आहे. आम्ही नेत्यांमुळे नाही तर महापुरुषांमुळे आहोत. राजकारण, पदासाठी आम्ही विचारधारा विकायला काढलेली नाही. त्यावर आम्ही ठाम आहोत. असे मत त्यांनी व्यक्त केले.
चिंचवड भागात ऑल इंडिया पँथर सेनेच्या आकर्षक कँपैगनिंग चा प्रस्थापितांनी धसका घेतला आहे. त्यावर निळा रंग आणि महापुरूष हे लक्ष वेधून घेत आहे. बहुजन, वंचित, शोषित, पीडित समाजाच्या स्वाभिमानी वर्गात याचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे चर्चा आहे त्यामुळे येते परिवर्तन हमखास आहे.