21 मार्चला भिमाकोरेगाव स्तंभाला संरक्षण वाढवा – दिपक केदार

पुणे : वडू बुद्रुक येते छत्रपती संभाजी महाराज स्मारक स्थळी अनेक कर्मठ हिंदुत्ववादी हेट स्पीच मध्ये आरोपी असलेल्या प्रवृत्ती येणार असल्याचे सोशल मीडियातून निदर्शनास आले आहे.
सातत्याने दंगलीला खतपाणी घालणारे विधाने करणारे सुदर्शन चॅनेल चे प्रमुख सुरेश चव्हाणके ज्याने नुकतीच हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी शपथ सुद्धा घेतली होती, यावर त्याच्यावर कार्यवाही सुद्धा झालेली आहे. भडकाऊ भाषण करण्यात तो पटाईत आहे, मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी नुकतेच भडकाऊ विधान केले आहे. अशा प्रवृत्तीवर महाराष्ट्रात फिरण्यास देशात भाषण करण्यास बंदी आणली पाहिजे!
22 मार्च 2023 ला वडु बुद्रुक येते हा व्यक्ती येणार असून तो तिथे धार्मिक घरवापसी सारखा गैर संवैधानिक कार्यक्रम घेणार असल्याचे त्याने एका मिडीयाला प्रतिक्रिया देताना सांगितले आहे. त्याच्यासोबत भिमाकोरेगाव दंगलीत सहभागी असलेले व गैर कायद्याचे दंगलखोर लोकं असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. या त्याच प्रवृती आहेत ज्यांच्या डोळ्यात आंबेडकरी बहुजन समूहाची अस्मिता असलेले भिमाकोरेगाव खुपत आलेले आहे.
तात्काळ गृह विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन राज्याच्या पोलीस यंत्रणेने त्या दिवशी भिमाकोरेगाव विजय स्तंभ येते मोठे संरक्षण द्यावे, संरक्षणात मोठी वाढ करावी आणि स्तंभ सुरक्षेसाठी व महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरेश चव्हाणके सारख्या प्रवृत्तीवर तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. महाराष्ट्रात येण्यास यांच्यावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार आणि पँथरनामा शी बोलताना केली आहे!