Uncategorized

गारडगाव खामगाव येते दलित तरुणाची डोक्यात दगड घालून हत्या; दिपक केदार पीडितांच्या घरी!

बुलढाणा : गारडगाव, खामगाव तालुक्यात असून हप्ता झाला तरी आरोपी अटक होत नाहीत. अतिशय किरकोळ भांडणावरुन बौध्द तरुण गवई च्या डोक्यात गावातील दोघा जणांनी दगड घातला. त्यात तो जखमी झाला. चार दिवस त्याला नीट दवाखान्यात इलाज मिळाला नाही त्यामुळे त्याचा मृत्यू झाला

गारडगाव, खामगाव, बुलढाणा येते अनुसूचित जातीच्या बौध्द तरुणाला किरकोळ भांडणावरून दगडाने हल्ला केला. यात चार दिवसाने त्याचा मृत्यू झाला. भेट देऊन या घटनेला वाचा फोडली. यातील आरोपी अद्याप अटक नाहीत. खामगाव सरकारी दवाखान्याने रेफर करताना, अकोला सरकारी दवाखान्याला सिटी स्कॅन रिमार्क केला पण अकोला सरकारी दवाखान्याने सिटी स्कॅन न करता त्यांनी तो रिमार्क कट केला. त्यामुळे डोक्यात दगडाने ठेचलेले असताना त्याचा साधा सिटी स्कॅन अकोला हॉस्पिटलने केला नाही.

काळजीपूर्वक दखल घेतली असती तर हा तरुण वाचला असता, आधी हल्ला आणि नंतर प्रशासनिक हल्ला यात हा दलित तरुण मृत्युमुखी पडला.
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे. आरोपीला अटक करावी, निष्क्रिय अधिकारी अकोला डीन वर गुन्हा दखल करावा, कुटुंबाला सुरक्षा द्यावी, 25 लाखांची मदत करून पीडित भावाला शासकीय नोकरी द्यावी.

अशी मागणी दिपक केदार यांनी केली आहे. लवकरच खामगाव येते निळा आक्रोश मोर्चा काढून आवाज केला जाईल!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!