चळवळ

प्रा. कवाडे – शिंदे युतीची घोषणा

मुंबई : आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे अध्यक्ष आहेत. पीपल्स रिपब्लिकन पार्टी या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन अतिशय घाई गडबडीत युती जाहीर केली आहे.

ही वैचारिक युती असल्याचे मत प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले यावेळी प्रलंबित प्रश्नांचा पाडा त्यांनी वाचला. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आम्ही दोघे संघर्ष करणारे आहोत. अनेक दिवसापासून आमची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही स्वार्थ न ठेवता त्यांनी युती केल्याचे जाहीर केले.

यावेळी त्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अशा उल्लेख केला तीन वेळा सांगून ही त्यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी म्हणता आले नाही. त्यामुळे पक्षाचे नाव चुकतंय म्हंटल्यावर ही युती किती प्रभावी आहे याचे संकेत मिळतात. जय शिवराय जय भीम चा नारा सुरू होता. सोशल मिडीयातुन टीका तर कुठे कुठे स्वागत ही करण्यात आले आहे. हळूहळू सगळेच आता युतीच्या बंधनात अडकले आहेत. कुणाच्या पदरात काय पडणार आणि यात प्रामुख्याने सामजाच्या पदरात काय पडणार हे येणारा काळ सांगेल!

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!