Uncategorized
मनोज जरांगे यांच्या भेटीला उद्या दिपक केदार अंतरवलीत येणार!

पुणे : शोषित मराठ्यांच्या न्याय हक्कांसाठी ग्रामीण भागातील एक लढवव्या क्रांतिकारक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने राज्य खडबडून जागे केले आहे. ते आंदोलन चिरडून टाकण्यासाठी जो लाठीचार्ज झाला तो अमानवीय होता त्याचा निषेध ऑल इंडिया पँथर सेनेनी केला आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार हे उद्या दि. 08 सप्टेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता ते आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. त्यामुळे पँथर आणि मावळा भेटीची चर्चा सुरू झाली आहे.
मी येतोय, 48 तासाचा इशारा त्यांनी दिला असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्यांची आक्रमक भूमिका गाजलेल्या आहेत. ते कसे सरकारला धारेवर धरणार यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कार्यकर्ते मोठ्या संख्येने येणार असल्याचे समजले.