Uncategorized

कायद्याला उडवता, येणाऱ्या निवडणुकीत हिसका दाखवू – बंटीदादा सदाशिवे

ऑल इंडिया पँथर सेनेचे महाराष्ट्र प्रवक्ते बंटीदादा सदाशिवे यांनी आमदार संजय शिरसाठ यांचा आक्रमक पणे समाचार घेतला आहे.कायद्याला उडवून लावण्याची भाषा एका संविधानिक पदावर बसलेला आमदार करत असेल तर हे निषेधार्थ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चार लेकरं गमावून आम्हाला संविधान दिले याचा विसर या आमदाराला पडला आहे. समाज माफ करणार नाही, येणाऱ्या निवडणुकीत यांना हिसका दाखवला जाईल.केंद्रात, राज्यात सरकार तुमची, गृहमंत्री तुमचा त्यावर बोलत नाहीत. ठेचायची भाषा करा आम्ही स्वागत करतो, ज्या भाजपा पदाधिकाऱ्याची शाळा आहे त्याला कधी ठेचता? औरंगाबादला बसून तुम्ही कायद्याला उडवता, तिथे त्या चिमुरडीला भेटायला गेले का? उंटावरून शेळ्या हाकता? हजारो दलित अत्याचार झाले कधी त्या दलितांना विचारले का? आम्ही काहीही सहन करू पण बाबासाहेबांच्या कायद्याला कुणी उडवण्याची भाषा करत असेल तर त्याला ऑल इंडिया पँथर सेना सोडणार नाही. आम्ही शांत बसणार नाहीत, या आमदाराने माफी मागावी. छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढून संजय शिरसाठ यांच्यावर आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालावी अशी मागणी करणार आहोत. तात्काळ विधानसभा अध्यक्षानी या वक्तव्याची दखल घेऊन आमदारकी रद्द करावी. आमदार होताना काय शपथ घेतली याची जाणीव त्यांना करून द्यावी. अशी संतप्त प्रतिक्रिया ऑल इंडिया पँथर सेनेनी घेतली आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!