पँथरयौद्धा नामदेव ढसाळ यांचे नाव राज्यसरकारने महान व्यक्तीच्या यादीमध्ये सामील करावे!

राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचं नाव महान व्यक्तिच्या यादीत टाकले आहे, महान व्यक्ती त्याच्या कार्यकर्तुत्वाने ओळखली जाते महान व्यक्तीचं माफ़दंड म्हणजे आपली सत्ता मनमानी कारभार असंच चित्र दिसतंय.साहित्यिक, कवी, बंडखोर यौद्धा, पँथर निर्माता, मनुवाद्यांवर आधुनिकपणे भाष्य करून दलित चळवळ आक्रमकपणे निर्माण करणारा बेडर निडर महानेता, जातीयतेविरोधात लढलेले आधुनिक क्रांतिचे प्रणेते नामदेव ढसाळ यांचं कार्य जागतिक स्तरावर गाजले आहे. महाराष्ट्रातल्या एका गरीब कुटुंबातल्या भीमसैनिकाची कसलीही राजकीय पार्शवभूमी नसणाऱ्या दलित कार्यकर्ता ते दलित पँथर संस्थापक नामदेव ढसाळ यांनी लेखणीतून व रस्त्यावरच्या संघर्षातून पृथ्वीवरील सर्वात मोठी आधुनिक लढवय्या क्रांती केली. नामदेव ढसाळ यांचं कार्य जगजाहीर आहे, राज्य सरकारकडे ऑल इंडिया पँथर सेनेची मागणी आहे की, कार्यकर्तुत्व पाहून महान व्यक्तींची यादी बनवली पाहिजे. नामदेव ढसाळ यांचं कार्यकर्तुत्व महान व्यक्तीच्या स्तरावरच आहे. त्यामुळे तात्काळ महान व्यक्तींच्या यादीत नामदेव ढसाळ यांचे नाव टाकावे अशी ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे.पँथरयौद्धा नामदेव ढसाळ यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन! #NamdeoDhasal-दिपक केदारराष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना #AllindiaPantherSena www.allindiapanthersena.com