बहुजनाना गुलाम करण्याचे षडयंत्र ओळखा – दिपक केदार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी महामानवाच्या पुतळ्याला अभिवादन केले.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना या देशात पुन्हा एकदा बहुजनाना गुलाम करण्याचा अजेंडा मनुवादी राबवत आहेत. संविधान विटंबणा, दलितांचे कोम्बिंग, दलित, मराठा तरुणांच्या हत्या हे सुनियोजितपणे सुरु आहे. गृहमंत्री अमित शहा सारखा अज्ञान माणूस महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करतो हे सुद्धा त्याच कटाचा भाग आहे. परभणीतील भीमसैनिकांनी संविधान आम्हाला किती महत्वाचे आहे हे दाखवून दिले त्यासाठी मरण्याची तयारी दाखवली आणि संविधान उद्धवस्त करू पाहणाऱ्याला संपवण्याची तयारी सुद्धा दाखवली. सतत आंबेडकरी समूहाची टेस्टिंग केली जाते आणि त्या टेस्टिंग मध्ये आंबेडकरी समूह ताकदीने उभा आहे.
सहज हिंदू राष्ट्राची भाषा येते सुरु आहे. हे सगळं हिंदू राष्ट्र निर्माण करून मनुवाद जिवंत करत बहुजनाना गुलाम करण्याचा अजेंडा आहे त्यामुळे हा अजेंडा ओळखला पाहिजे आणि पुन्हा एकदा नामांत्तर लढ्यातील शहीदांसारखी झुंज देण्याची तयारी दाखवली पाहिजे.
असे प्रखड मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.