ऑल इंडिया पॅंथर सेनेची बुलढाणा जिल्हास्तरीय आढावा बैठक २४ मे २०२५ रोजी…

बुलढाणा : ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक दीपक भाई केदार आणि महाराष्ट्र अध्यक्ष विनोदभाई भोळे यांच्या आदेशानुसार, विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले, विदर्भ नेते संकेत भाई जाधव आणि जिल्हा प्रभारी अमोल भाई शेगोकार यांच्या सूचनेनुसार, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांच्या नेतृत्वात दि. २४ मे २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता पातुर्डा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीस अभिवादन करण्यासाठी विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले येत आहेत.
याच ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेची बुलढाणा जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, जाहीर प्रवेश आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होणार आहे. विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्हाध्यक्ष विजयभाई वानखडे यांच्या नेतृत्वात ही महत्वपूर्ण बैठक संपन्न होईल.
ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सदस्यांना या बैठकीला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
स्थळ: पातुर्डा, बुलढाणा
वेळ: सकाळी ११:०० वाजता
दिनांक: २४ मे २०२५