विदर्भात पँथर झंजावात कायम; ऑल इंडिया पँथर सेना अकोला जिल्ह्याच्या वतीने आढावा बैठक व जाहीर प्रवेश!

ऑल इंडिया पँथर सेनेचा विदर्भात झंजावात! अकोला जिल्ह्यात आढावा बैठक व जाहीर प्रवेश
अकोला: ऑल इंडिया पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अकोला जिल्ह्यात असंख्य पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी ऑल इंडिया पँथर सेनेत जाहीर प्रवेश केला. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा अध्यक्ष परवेज खान यांच्या नेतृत्वात आढावा बैठक आणि जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या बैठकीत कार्यकर्त्यांनी संघटनेचे हात प्रचंड ताकतीने बळकट करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले आणि विदर्भ नेते संकेतभैया जाधव यांनी उपस्थित राहून नवप्रवेशी कार्यकर्त्यांचा नियुक्ती पत्र देऊन सत्कार केला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष आरीफ शहा, जिल्हा संघटक संजय पावनमारे, जिल्हा कायदेशीर सल्लागार ॲड. श्रीकांत वाहुरवाघ, महिला शहर अध्यक्ष पूजा जाधव, अश्विनी नरवाडे, रफिक शहा यांच्यासह जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चासत्रात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, ऑल इंडिया पँथर सेना विदर्भात आपला झंजावात कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे.
स्थळ: अकोला
दिनांक: २३ मे २०२५