आमच्या तरुणांना पुन्हा कुणी टार्गेट केल्यास त्यांना जशाचे तसे उत्तर दिले जाईल – दादासाहेब ढोले

वाशीम, दि. 23 मे 2025: ऑल इंडिया पँथर सेनेने वाशिम येथे आपली ताकद पुन्हा सिद्ध केली! संघर्ष नायक दिपकभाई केदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असंख्य कार्यकर्त्यांनी आज पँथर सेनेत जाहीर प्रवेश केला.
विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले यांच्या नेतृत्वात विदर्भ संघटन बांधणी सुरु आहे.
येणाऱ्या स्थानिक स्वराज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित संवाद कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी प्रचंड उत्साहाने संघटनेचे हात बळकट करण्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष दादासाहेब ढोले, विदर्भ नेते संकेत जाधव, वाशिम जिल्हा अध्यक्ष नितीन बनसोडे यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी दादासाहेब ढोले यांनी भीमजयंतीच्या काळात वाशिममध्ये घडलेल्या विटंबणा प्रकरणावर कडक शब्दांत इशारा दिला.
ते म्हणाले, “वाशिममध्ये भीमजयंतीदरम्यान तरुणांना टार्गेट करून विटंबणा करण्याचे प्रकार घडले आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापुढे आम्ही वाशिम जिल्ह्यावर बारकाईने लक्ष ठेवू. आमच्या तरुणांना पुन्हा कुणी टार्गेट केल्यास त्यांना जशाचे तसे उत्तर दिले जाईल!
“पँथर सेनेचा हा झंजावात स्थानिक स्वराज निवडणुकीत नवा इतिहास घडवण्यास सज्ज आहे! पँथर सेना जिंदाबाद!