Uncategorized

सरकारची मानसिकता आंदोलन रोखण्याची, न्याय देण्याची नाही – दीपक केदार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका ही न्याय देण्याऐवजी आंदोलन रोखण्याची व चिरडून टाकण्याची आहे. आंदोलकांची बदनामी करून, कोर्टात चुकीचे अहवाल सादर करून समाजात गोंधळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. असे गंभीर आरोप ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी आज बीड येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत केले.केदार म्हणाले की,“दोन-दोन महिने आंदोलक मैदानावर उपोषण करत होते. हे सरकारच्या संकेताशिवाय, चुकीचे आयबी रिपोर्ट दिल्याशिवाय शक्य नाही.

आंदोलकांची दिशाभूल करणारी माहिती कोर्टात सादर करण्यात आली आणि कोर्टालाही गोंधळविण्यात आले. सरकार, त्यांचे प्रवक्ते आणि लोकप्रतिनिधी हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.आज धक्कादायक चित्र महाराष्ट्राने पाहिले. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना शिवी दिल्याचे दाखवून मुंबईत सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. त्या बॅनरवर मुख्यमंत्र्यांचे उत्तर दाखवण्यात आले. जर आंदोलकांना न्याय द्यायचा असेल तर असे बॅनर का लावले जात आहेत? हा प्रयत्न मराठा समाजाच्या भावना भडकवण्यासाठी आणि संघर्ष उभा करण्यासाठी आहे.

”केदार पुढे म्हणाले की,“सरकारच्या पाठिंब्याशिवाय एवढी मोठी चॅलेंज करण्याची हिंमत कोणाचीच नाही. आम्ही साधे कार्यकर्ते जर आंदोलनाचे आव्हान दिले तरी आयबी मागे लागते, हे आम्हाला माहित आहे. कोर्टाने परवानगी नाकारली, तरी मराठा समाजाने संयम दाखवला. आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सतत बॅनरबाजी, चिथावणी व चॅलेंज देण्याचे प्रकार सरकारकडून घडवून आणले जात आहेत.

”ते पुढे म्हणाले,“सरकारची मानसिकता दंगली घडवण्याची आहे. आंदोलनाला ते नक्षलवादी ठरवतात, आंदोलकांशी चीड दाखवतात. सामाजिक न्याय देण्याऐवजी चिरडून टाकण्याची भूमिका घेतली जाते. भविष्यात आंदोलन चिरडण्यासाठी ‘जन सुरक्षा विधेयकां’सारख्या उपायांचा विचार सरकार करत आहे, अशी शंका वाटू लागली आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, गुजरातची नाही. मुंबई मिळवण्यासाठी बलिदान झाले आहे. त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांना राजधानीत येण्याचा अधिकार आहे. नाशिकवरून आदिवासींचा मोर्चा निघाला, आंबेडकर भवन बचाव आंदोलनात लाखो लोक जमले, तरी अडचण आली नाही. मग फक्त मराठा समाजाच्या आंदोलनालाच रोखले जाते का?

”शेवटी केदार म्हणाले,“मराठा समाजासोबत दगाफटका झाला तर पॅंथर सेना गप्प बसणार नाही. प्रसाद लाडसारख्या लोकांचे उचकावणारे वक्तव्य जर थांबवले नाही, तर महाराष्ट्रात गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या आंदोलनाचे स्वागत झाले पाहिजे. अन्यथा पॅंथर सेना आपल्या पद्धतीने मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.”

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!