Uncategorized

जवाहर नवोदय विद्यालयातील दलित चिमुरडीच्या मृत्यू प्रकरणी पॅंथर सेनेचे प्रमुख दीपक केदार लातूरमध्ये; 8 जानेवारीला पीडित कुटुंबाची भेट!

लातूर | प्रतिनिधीलातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांपूर्वी सहावीमध्ये शिकणाऱ्या 12 वर्षीय अनुसूचित जातीतील दलित मुलगी अनुष्का हिचा संशयास्पद मृत्यू आढळून आल्याची घटना संपूर्ण राज्यात खळबळ उडवणारी ठरली आहे. या प्रकरणात पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही, असा आरोप केला जात आहे.पीडित कुटुंबीयांना थेट आपल्या मुलीचा मृतदेह पोस्टमार्टम रूममध्ये पाहावा लागला. अनुष्काने स्वतः आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली, की तिच्यावर अत्याचार झाला—या बाबत स्पष्टता नसताना आरोपींना अटक न झाल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिस यंत्रणा अपेक्षेप्रमाणे तपास करत नसल्याचा आरोप कुटुंबीय आणि सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.या घटनेचा पॅंथर सेनेचे प्रमुख दीपक केदार यांनी व्हिडिओ लाईव्हद्वारे तीव्र निषेध करताच हे प्रकरण राज्यभर गाजले. त्यांच्या भूमिकेमुळे प्रशासनाची हालचाल वाढली आणि त्यानंतर काल अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता दीपक केदार हे पीडित चिमुरडी अनुष्का हिच्या टाका (ता. लातूर) येथील गावात भेट देणार आहेत. तेथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार आहे.दीपक केदार यांनी स्पष्ट इशारा देताना सांगितले की, मातंग समाजातील व अनुसूचित जातीतील असल्यामुळे जर या प्रकरणात न्याय नाकारला जात असेल, तर ते सहन केले जाणार नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.या घटनेमुळे दलित अत्याचार, शासकीय निवासी शाळांतील सुरक्षितता आणि पोलीस तपासाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

पँथरनामा

पँथरनामा, सामाजिक क्रांतीची आधुनिक डरकाळी... पँथरनामा ऑल इंडिया पँथर सेनेचे मुखपत्र आहे. सामाजिक, राजकिय, आर्थिक, सांस्कृतिक गुलामगिरीच्या विरोधात नव्या स्वातंत्र्याचा संघर्ष, आंबेडकरी चळवळीच्या चौथ्या पर्वाच्या माध्यमातुन आम्ही लढत आहोत. -दिपक केदार संपादक पँथरनामा राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पँथर सेना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!