कोल्हापुरात पँथर डरकाळी, चरणदास कांबळेची कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड!

पुणे : ऑल इंडिया पँथर सेना पुणे येते कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणांनी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय दिपक केदार यांची भेट घेतली अनेक विषयांवर चर्चा झाली.
यावेळी ऑल इंडिया पँथर सेनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष पदी चरणदास कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.
कोल्हापूर पँथर डरकाळी फोडण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब शेंडगे व महाराष्ट्र सरचिटणीस जितेश भाई जगताप यांनी यावेळी नियुक्ती पत्र देऊन त्यांचे v सर्वांचे संघटनेत स्वागत केले.
अनेक गंभीर प्रश्न या भागात प्रलंबित आहेत. महापुरानंतर उद्ध्वस्त झालेल्या बौद्धांना आजही त्यांचं पुनर्वसन झालेले नाही. पक्के घर नाहीत, गावठाण जमिनी ताब्यात घेण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत जातीय भूमिकेतून काढण्याचा प्रयत्न करत आहे. बेरोजगारी अफाट वाढलेली आहे. सामाजिक न्याय विभागातील हक्काचा निधी इतरत्र वळवला जातोय.
लढाऊ आंबेडकरी कार्यकर्त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी 353 चा गैरवापर केला जातोय. आणि राजकिय गुन्ह्यात शिक्षा ठोकून आंदोलनाचे शस्त्र संपवण्याचा कट केला जातोय. अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. हुपरी बस स्थानकास छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्यात यावे या मागणीसाठी संघर्ष सुरू आहे त्यासाठी सुद्धा तात्काळ नाव न दिल्यास रस्त्यावरचे आंदोलन तीव्र करण्याची भुमिका यावेळी ठरवण्यात आली.
संविधान वाचवण्यासाठी, बुद्धांचा शांतीचा, मानवतेचा देश जिवंत ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र संकल्पने विरोधात लढा तीव्र करावा लागेल. अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.
आंबेडकरी चळवळीचे चौथे पर्व आम्ही निर्माण करतोय असे मत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांनी व्यक्त केले.
जय भीम नमो बुद्धाय